इनऑर्बिट मॉल मालाडमध्ये ‘रिफ्लेक्शन्स ऑफ जॉय’सोबत साजरी करा दिवाळी प्रकाश अन् आनंदोत्सवाचा ३० दिवसांचा उत्सव

मुंबई : या दिवाळीत इनऑर्बिट मॉल मालाडने पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा संगम घडवत ‘रिफ्लेक्शन्स ऑफ जॉय’ या थीमखाली ३० दिवसांचा दिवाळी उत्सव आयोजित केला आहे. कला, संगीत आणि समुदायभावना यांचा हा अनोखा सोहळा प्रकाश आणि आनंदाचा उत्सव ठरणार आहे.

या उत्सवाच्या केंद्रस्थानी आहे मॉलचे आकर्षक दिवाळी डेकोर – आधुनिक डिझाइन आणि पारंपरिकतेचे सुंदर मिश्रण. आरशांच्या कमानी, चमकणारे झुंबर, आणि रंगीबेरंगी इन्स्टॉलेशन्समुळे मॉल एक तेजस्वी विश्व बनले आहे. या सजावटीतून वारसा आणि नवकल्पना यांचा सुरेख संगम जाणवतो.

उत्सवाची सुरुवात ‘हॅपी दिवाळी’ या इंटरअॅक्टिव्ह रिवॉर्ड गेम इन्स्टॉलेशनपासून होते. यात सहभागी होण्यासाठी ग्राहकांना स्कॅन करून नोंदणी करावी लागते आणि ‘डार्ट गेम’मध्ये दिवे व भेटपेट्यांसारख्या डिझाइनवर लक्ष्य साधायचे असते. यातून ग्राहकांना दररोज रोमांचक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळते. यात ब्रँड व्हाउचर्स, खाद्यपदार्थांवरील ऑफर्स आणि चित्रपट तिकीटे यांचा यात समावेश आहे. या खेळातून दिवाळीचा उत्साह आणि स्पर्धेचा आनंद दोन्ही मिळणार आहे.

मॉलचा अट्रियम संगीत आणि नृत्याच्या तालांनी उजळून निघणार आहे. १८ ऑक्टोबरला बॉलीवुड आणि हिप-हॉप फ्युजन डान्स परफॉर्मन्सने उत्सवाला रंगत आणली जाईल. तर १९ ऑक्टोबरला ‘फ्युजन इन्स्ट्रुमेंटल नाईट’मध्ये तबला आणि गिटार यांची सुरेख जुगलबंदी पाहायला मिळेल — पारंपरिक लय आणि आधुनिक सुरांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळेल.

२१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान इनऑर्बिटचे फोटोग्राफर्स ग्राहकांच्या आनंदी क्षणांचे कॅमेऱ्यात टिप घेतील आणि त्यांचे फोटो ‘रिफ्लेक्शन्स ऑफ जॉय’ या थीमवर आधारित खास फोटो जॅकेटमध्ये तत्काळ प्रिंट करून देतील — एक आठवण म्हणून ही स्मृती घर घेऊन जाता येईल.

प्रत्येक प्रकाशकण, स्वर आणि हास्यातून इनऑर्बिट मॉल मालाड दिवाळीचा खरा अर्थ एकत्र येणं आणि आनंद साजरा करत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ‘रिफ्लेक्शन्स ऑफ जॉय’सारखा प्रकाशमान आणि आनंददायी असो!

More From Author

अभय भुतडा फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडास 5 कोटी रुपयांची देणगी

ऍक्सिस बँकेचे ‘स्प्लॅश २०२५’ देशभरातील मुलामुलींना त्यांची स्वप्ने व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे – देशव्यापी कला, हस्तकला आणि साहित्य स्पर्धा